माणदेशातल्या एका 'लेंगरवाडी' नावाच्या वाडीवर बेतलेली वाडी. १९३८ साली माडगूळकर त्या गांवी होते तेव्हा तिथल्या अनुभवांचे वर्णन कादंबरीरूपात 'बनगरवाडी' या नावाने आपल्यासमोर येते. माणदेश, मेंढके, त्यांची जीवनपद्धती याबद्दल सांगतानाच तिथल्या लोकांच्या निर्व्याजपणाचे चित्रणही अतिशय समर्थपणे यात येते. स्वत: माडगूळकरही त्याच भागातले. त्यामुळे हे वर्णन अगदी जिव्हाळ्याने येते.