ओळख
जीवनाच्या एका प्रवासात, मी काही शब्द लिहिले. ते शब्द एका विशिष्ट रचनेत बांधले गेले. आणि मी त्या शब्दांच्या रचनेला ‘कविता’ म्हणू लागलो. मला ‘कविता’ ह्या प्रकाराच स्वरूप स्पष्ट माहिती नाही; त्यामुळे मला स्पष्ट सांगता येणार नाही की, मी ह्यांना ‘कविता’ का म्हणतो किंवा त्यांना कविता म्हणण त्या शब्दरचनेला योग्य नाव आहे का? पण ह्या माझ्यासाठी ‘कविता’ आहेत. मला माहिती नाही की, त्या खरोखरीच ‘कविता’ आहेत की, नाहीत? पण माझ्यासाठी त्या कविता म्हणून आल्या आणि मी त्या कवितांप्रमाणेच मांडल्या. मला ह्या अशा कवितेच स्पष्ट स्वरूप माहिती नाहीये आणि तरीही मी त्यांना कायम ‘कविता’ म्हणतो. कविता म्हणण्यासारख स्पष्टत्व ह्यात नाहीये आणि म्हणूनच मी ह्यांना ‘म्हणावं तर कविता’ असं म्हणतो.