ओळख
'तिच्याशी बोलताना’ मी खूप बोललो. माझ्या आयुष्यातील एका दिवसानंतर खूप बोललो. ती गेल्यानंतरही तिच्याशी खूप बोललो. स्वत:च आयुष्य पणाला लावून तिच्याशी बोललो. मनातील चांगल्या-वाईट सगळ्या गोष्टी तिच्याशी बोललो. तिला वाईट वाटावं म्हणून काही गोष्टी बोललो. आणि तिने माफ करावं म्हणून तिच्याशी काही छान गोष्टी बोललो. तिने डोळेभरुन रडावं म्हणून तिला दु:खद गोष्टी सांगितल्या आणि तिने हसावं म्हणून तिला आयुष्याचे गमतीदार विचित्र किस्से संगितले. तिने परत माझ्याकडे बघावं म्हणून उगीचच रडलो आणि तिची नाराजी दूर करण्यासाठी तिला सतत उघड्या डोळ्यांनी पाहत राहिलो. तर अशाच सर्व गोष्टींची एक जत्रा जमून आली आणि मला ह्या जत्रेत कधी हरवल्याची भीती वाटली; तर कधी पुन्हा भेटल्याची गोड अनुभूती &